रेडिओ विंगच्या राज्य अधिवेशन लोगोचे थाटात अनावरण

बुलढाणा :- व्हॉइस ऑफ मीडियाच्या रेडिओ विंगच्या आगामी काळात होऊ घातलेल्या लोगोचे थाटात लोकार्पण करण्यात आले. बुलढाण्यातील गोवर्धन सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. व्हॉईस ऑफ मीडिच्याच्या रेडिओ विंगचे राज्य अधिवेशन नाशिक येथे ११ जून २०२३ रोजी होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध लेखक तथा ज्येष्ठ संपादक चंद्रकांत वानखेडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव , सिंदखेडराजाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.राजेंद्र शिंगणे, चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन मेनकुळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, प्रसिद्धी प्रमुख स्वामी पाटील, वाशीम जिल्हाध्यक्ष भागवत मापारी आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोनानंतर पत्रकार आणि पत्रकारितेची परिस्थिती बदलली आहे. अशात पत्रकारांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी व निर्माण परिस्थिती बदलण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाने उभारलेल्या व्यापक लढ्यात यश मिळावे, अशा शुभेच्छा मान्यवर मंडळींनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले.

NewsToday24x7

Next Post

AOP Nagpur &Nelson Hospital organised CME on pulmonology

Wed Jun 7 , 2023
Nagpur :- Privileged to witness the grand opening of paediatric pulmonology department at Nelson hospital under mentorship of Dr Satish Deopujari stalwart paediatrician And Dr Charde to lead the department. The Pulmonology Department has been equipped with all state of art pulmonology facilities like PFT, FeNO, Impulse Oscillometry, Bronchoscope (Flexible and Rigid), Polysomnography (PSG), Asthma clinic and Sleep clinic. So […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com