सायकल रॅलीतून मतदार जनजागृतीचा संदेश

चंद्रपूर :- निवडणुक हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार सर्वांनी निर्भीडपणे बजावून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आगामी निवडणुकीत मतदान करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन,जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय ते मनपा पार्किंग स्थळ पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.समारोपीय कार्यक्रम मनपा पार्किंग प्रांगणात पार पडला. याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी यांनी सांगितले कि कालच चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.१७ लक्ष ८२ हजार ३१६ मतदार आपल्या जिल्ह्यात आहेत. मतदानाच्या हक्कानेच समाजात सकारात्मक बदल घडविणे शक्य असल्याने सर्वांनी मतदानाचा हक्क बजविण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी व उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञेचे वाचन केले.कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, सहायक जिल्हाधीकारी श्री.मुरुगानाथन,तहसीलदार विजय पवार,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त श्री.मंगेश खवले तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

Fri Jan 26 , 2024
नागपूर :- राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये आज उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जनत करुन आणि मुक्त नि:पक्षपाती शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलेाभनास बळी न पडता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com