चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, बालाजी वार्ड येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन नगरसेवक प्रशांत दानव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे नगरसेवक विशाल निंबाळकर उपस्थित होते. या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ . योगेश्वरी गाडगी यांच्यासह डॉ. अरोरा या तज्ञ डॉक्टर मंडळींकडून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदाब, शुगर, क्षयरोग, कोविड लसीकरण व आरोग्य विषयक तपासणी करून घेतली.
यावेळी कोविड लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित महिला आणि नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेण्याचे आवाहन करण्यात आले