संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नेहमी चर्चेत असलेल्या रणाळा येथील हवेली बार मध्ये चार इसमानी दारू पिल्यानंतर दारूचे बिल देण्यावरून वाद घातला व हवेली बार अँड रेस्टऑरेंट मध्ये तोडफोड करून अश्लील शिवीगाळ देत पाहून घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल रात्री 11 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी संकेत संजय यादव वय 27 वर्षे रा यादव नगर कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 427,504,506 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.