ग्राम पंचायत आमडी येथे हल्दी कुंकु कार्यक्रम

पारशिवनी :- दिनांक १९/१/२०२३/गुरवारला गट ग्रा.प.आमडी कार्यालयाचा सभाग्रहा मध्ये तीळ गुड घ्या अन् गोड गोड बोला असे म्हणत ग्रा पं आमडी मध्ये तीळ संक्रात निमीत्त सरपंच  शुभांगी भोस्कर चा वतीने आमडी-हिवरी गावातील महीलांचा हळदी कुंकु चा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या पल्लवी जयस्वाल, रश्मी काठेकर प्रमुख्याने उपस्तीत होते. प्रमुख पाहुण्यांचा हस्ते दिप प्रज्वलन करून आधुनिक भारतातील प्रथम शिक्षका सावीत्रीबाई फुले यांचे प्रतीमेच पुजन करून.महिलांना तिळसंक्रातचा शुभेच्छा देऊन प्रमुख पाहुण्याचा हस्ते वान, तिळ गुड चे लाडु देण्यात आले. सरपंच शुभांगी भोस्कर यांनी मागील चार वर्षात केलेल्य कामाची छायांकीत वार्षीक दिनदर्शीका (कैलेन्डर)प्रमुख पाहुणे यांचे हस्ते वितरण करण्यात आले.हळदीकुंकु चा कार्यक्रमाला उपस्तीत ग्रामपंचायत सदस्या,सचीव,आमडी- हिवरी गावातील माण्यवर महीला मोठ्या संख्येने उपस्तीत होत्या.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

२ दिवसांत आणखी २६ नळ जोडणी कपात, आतापर्यंत ८६ थकबाकीदारांवर कारवाई

Fri Jan 20 , 2023
चंद्रपूर – पाणीपट्टी कराचा भरणा न करणार्‍या ८६ लाभधारकांची नळ जोडणी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे बंद करण्यात आली असुन कराचा भरणा त्वरीत करा अन्यथा नळ कपातीस तयार राहण्याचा संदेश मनपाद्वारे देण्यात येत आहे. यापुर्वी ६५ व या २ दिवसात २६ अश्या एकुण ८६ थकबाकीदारांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली आहे. पाणीकराची करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम सातत्याने राबविण्यात येत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com