गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा…;पायर्‍यांवर वॉशिंग मशीन आणि गुजरात निरमा असे बॅनर फडकवून महाविकास आघाडीच्या आमदारांचे अनोखे आंदोलन…

मुंबई :- गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा… पन्नास खोके, एकदम ओके…गुजरात निरमा… ईडी, सीबीआय, आयटी मागे नाही लागणार… वॉशिंग मशीन खोके, आणि गुजरातचा निरमा, महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लीनचीट मिळवा… गुजरात निरमा अभियान, चला पवित्र होऊन येऊ…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सतरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गुजरातची निरमा आणि वॉशिंग मशीनचे बॅनर घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धुळीच्या साम्राज्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Fri Mar 24 , 2023
संदीप बलविर, प्रतिनिधी – रस्ता बांधकामात कंत्राटदाराचा मनमानी कारभार – सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष – बोरखेडी (रेल्वे) ते आलागोंदी आष्टा प्रधानमंत्री सडक योजना नागपूर :- देशातील प्रत्येक गाव हे शहराशी जोडले जावे म्हणून देशात प्रधानमंत्री सडक योजना राबविली गेली.त्यामुळे देशातील दुर्गम आणि शहराला जोडण्यासाठी ग्रामीण भागात रस्त्याचे काम सुरू केल्याचे दृश्य सध्या पूर्ण महाराष्ट्रभर दिसून येते.याच धर्तीवर सद्यस्थितीत नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com