नागपूर :- दिनांक २०.०३.२०२४ रोजी मा. अति. सत्र न्यायाधिश, कोर्ट क्र. ६, नागपूर जी.पी. देशमुख, यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. २०२/२०२१ मधील पोलीस ठाणे प्रतापनगर येथील अप. क. २४९/२०२० कलम ३०२, ३४ भा.द.वि सहकलम १३५ म.पो.का या गुन्हयातील आरोपी क. १) संतोष हितलाल शाहु, वय ३८ वर्षे, रा. प्लॉट नं. १०, पठान ले-आउट, प्रतापनगर, नागपुर, २) लक्ष्मीनारायण उर्फ चंदन बालाकृष्णन नायर वय ६१ वर्ष रा. अंबाडी, जि. कोटायम (केरळ), ह.मु पलॉट नं. ४४, गुडधे ले-आउट, येथे किरायाने, नागपूर यांचे विरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, दोन्ही आरोपींना कलम ३०२ भा.द.वि. मध्ये आजीवन कारावासाची शिक्षा व ५,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
अनिल रामदास पालकर वय ४८ वर्ष रा. प्लॉट नं. २३. चौधरी ले-आउट, गोपाल नगर, तिसरा बस स्टॉप जवळ स्वतःचे घर असुन त्याच वस्तीतील त्यांचे मालकीचे दोन दुकान त्यांनी आरोपी क. १ व २ यांना किरायाने दिले होते. अनिल पालकर यांनी करारा प्रमाणे करार संपल्या नंतर आरोपींना दुकान खाली करून मागत होते.
दिनांक ०९.११.२०२० चे २०.०० वा. चे सुमारास, अनिल पालकर हे त्यांचे दुकानासमोर नारळ विकी करणाऱ्या सोबत किरकोळ भांडणाचे कारणावरून वर नमुद दोन्ही आरोपीतांनी संगणमत करून, दुकान खाली करून मागीतल्याने त्यांचे विषयी मनात राग धरून अनिल पालकर यांना हातबुक्कीने मारहाण करून खाली पाडुन जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने चाकुने वार करून अनिल पालकर यांना जिवानीशी ठार केले. याप्रकरणी फिर्यादी जुबेर वल्द ईसराईल खान, वय २५ वर्ष, रा. यशोधरानगर, नागपूर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे सदर गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी क. ०१ यांना दि. १०.११.२०२० व आरोपी क. ०२ यांना दि. १२११.२०२० रोजी अटक करण्यात आली होती.
गुन्हयाचे तपासी अधिकारी वपोनि बी. एस खणदाळे, दिनकर ठोसरे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. अभय जिकार यांनी तर, आरोपीतर्फे अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि अनिल ब्राम्हणकर, पोहवा, शेखर गायकवाड, गौतम होके यांनी काम पाहिले.