सार्वजनिक वाचनालयात राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची १०२ वी पुण्यतिथी निमित्य सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान व्दारे श्रध्दाजंली अर्पण करून अभिवाद न करण्यात आले.

सोमवार (दि.६) मे ला सायंकाळी ७ वाजता सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १०२ व्या स्मृतिदिन कार्यक्रम प्रकाशराव नाईक यांचे अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी देवराव कावळे यांनी भुषविले.सर्वप्रथम मान्यवरांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प माला अर्पण केली. त्यानंतर सर्व उपस्थितीत सभासद व वाचकांनी पुष्प अर्पण करून सर्वांनी दोन मिनिटे उभे राहुन मौनधारण करून श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवना विषयी तसेच कार्याबद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्याम बारई ग्रंथ पाल यांनी तर आभार प्रदर्शन कृणाल कोल्हे लिपिक यांनी केले. कार्यक्रमास दिनकर मस्के कोषाध्यक्ष, गंगाधर अवचट, जय तेलोते, आयुष सोनेकर, सुरज जांगेलकर, अनुज टिकले, अनिकेत दिवे, आशनी पॉल, मंजिरी पडोळे, जस्टीन पॉल सह वाचक व सभासद उपस्थित होते.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहिल्यानगर येथील सभेतून निशाणा

Tue May 7 , 2024
सावेडी :- मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही, पण आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी काँग्रेस आणि इंडी आघाडी मात्र, या हल्ल्याचे दोषी असलेल्यांना निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे वाटत असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दहशतवादी कसाबची बाजू घेत आहेत. आपल्या तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेस आणखी किती खालच्या थराला जाणार, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com