लष्करीबाग उपविभागात 24 लाखाच्या 40 वीजचो-या उघड

नागपूर :- महावितरणचे भरारी पथक आणि लष्करीबाग उपविभाग यांनी 5 ते 8 फ़ेब्रुवारी दरम्यान वीजचोरी विरोधात संयुक्तपणे राबविलेल्या धडक मोहिमेत तब्बल 24 लाखाच्या 40 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत. घरगुती आणि वणिज्यीक ग्राहकांकडून होणारी वीजचोरी थांबविण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहीमेत वीजचोरी करीत असलेल्या 40 पैकी 9 ग्राहकांनी वीजचोरी पोटी 3 लाख 52 हजाराचा भरणा देखील केला आहे.

महावितरणच्या लष्करीबाग उपविभागांतर्गत भरारी पथक व उपविभागातील अभियंता आणि कर्मचा-यांनी राबविलेल्या या संयुक्त मोहीमेत लष्करीबाग उपविभा अंतर्गत 40 ग्राहकांकडील तब्बल 95 हजार 293 युनिटची वीजचोरी उघडकीस आली. या चोरीचे अंदाजित मुल्य सुमारे 24 लाख 23 हजार 4560 रुपये असून या सर्व ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व वीज ग्राहकांनी वीजचोरीपोटी 3 लाख 52 हजाराचा आणि तडजोडीपोटी 47 हजार दंडाच्या रकमेचा भरणा देखील केला.

ही मोहीम महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता  अमित परांजपे, उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी)  सुनिल थापेकर, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त कार्यकारी अभियंता सर्वश्री हेमेंद्र गौर, श्रीकांत तळेगावकर आणि विवेक राऊत सहायक अभियंते राहुल चिंतलवार, ब्रिजेश यादव, जफ़र अकबर आणि मंग्र्श ताकसांडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा मोहत्सव 2024 मध्ये सिंसिअर टेनिस अकादमीचे खेळाडू चमकले

Sun Feb 11 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार खासदार क्रीडा मोहत्सव 2024 या मेगा इव्हेंटचा टेनिस एक भाग म्हणून रामनगर टेनिस मैदानावर आयोजित लॉन टेनिस स्पर्धेत सिंसिअर टेनिस अकादमीच्या विद्यार्थ्यांनी 5 ट्रॉफी जिंकल्या. खासदार क्रीडा मोहत्सवचे हे सहावे वर्ष आहे आणि त्याला संपूर्ण नागपूरमधील खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा लॉन टेनिस स्पर्धेत 10 प्रमुख गट होते – 10,12,14,16 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com