नवीन कामठी परिसरात आरोग्य सुविधेची वणवा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहराला नवीन कामठी परिसरातील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे जगाच्या नकाशावर कामठी शहराचे नाव कोरल्या गेले आहे. या नवीन कामठी परिसरात नगर परिषद चा एक भाग असलेला कुंभारे कॉलोनी, छत्रपती नगर,आययुडीपी परिसर आदी वस्त्यांचा समावेश आहे तर येरखेडा ग्रा प हद्दीत समावेश असलेला यशोधरा नगर, रविदास नगर आदी वस्त्यांचा समावेश असून सर्व धर्मीय नागरिक वास्तव्यास आहेत. या परिसरात विकासात्मक दृष्टिकोनातुन बऱ्याच सुविधा दिसून येतात त्यातच यात मार्गक्रमण करण्यासाठी उडानपुलची सुद्धा निर्मिती होती आहे. नागरीकांच्या आवश्यक गरजेचे भाग असलेले सर्व सुविधायुक्त मिनी बाजारपेठ उघडली त्यात बिअर बार उघडून दारूच्या नशेची गरज भागत आहे मात्र जीवनयोपयोगी नवसंजीवनी देणारे एकही रुग्णालय या परिसरात उघडू शकले नसल्याची शोकांतिका आहे. एखाद्याची प्रकृती अवाक्याबाहेर गेल्यास त्याना तडकाफडकी कामठी शहरात न्यावे लागते नेईपर्यंत वेळेअभावी बरेचदा मृत्यूच्या घटना घडल्या आहेत तर जीव वाचविण्यासाठी आरोग्यदायी संजीवणी असलेले एकही रुग्णालय या परिसरात नसल्याने या नवीन कामठी परिसरात आरोग्य सुविधेची वणवा दिसून येत असल्याची शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात लॉज, दारूचे दुकान उघडले , ऐशो आराम करण्याच्या सुविधा झाल्या मात्र अकस्मात घडलेल्या घटनेतुन जीवनदायी ठरणारी एकही रुग्णसेवा असलेले रुग्णालय उघडू शकले नाही याची खंत आहे.

कामठी नगर परिषदच्या विकास आराखड्यातिल सर्व्हे क्र 34 येथील आरक्षण क्र 57 ची जागा ही आयय्युडीपी परिसरात हॉस्पिटल उघडण्यासाठी आरक्षित आहे तर एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत 9 जानेंवारी 1984 अनव्ये 24 ए व 24 बी ची भूमी नगर परिषद कामठी च्या नावाने दाखल खारीज करण्यात यावे असे आदेश शासनाने दिले आहेत त्यानुसार सदर जागेवर हॉस्पिटल उघडण्याचा प्रस्ताव नगर रचना विभाग नागपूरकडे सादर करण्यात आलेला आहे तर शासनाने आययुडीपी अंतर्गत हॉस्पीटल उघडण्यासाठी कामठी नगर परिषद ला सर्व्हे क्र 24 ए व 24 बी ची जागा मंजूर केली आहे या जागेच्या कडेला परिसरातील नागरिकासाठी जलकेंद्रची सोय करून ती कार्यान्वित आहे तर या जलकेंद्राच्या बाजूला हॉस्पिटल साठी मंजूर असलेली आरक्षित जागा ही मोकळी पडून आहे मात्र नगर परिषदच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे अतिआवश्यक असलेला हॉस्पिटल चा प्रश्न अजूनही अधांतरी आहे यासंदर्भात माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी सदर जागेवर हॉस्पिटल उघडण्याच्या मागणीसाठी नगर परिषदला पत्रव्यवहार केले असता मात्र शासनाकडून मिळालेल्या जागेचा नगर परिषदने अजूनही ताबा घेतलेला नाही आणि हॉस्पिटल उघडण्यासाठी शासनाने नगर परिषदला मंजूर केलेल्या जागेतील सर्व्हे क्र 24 ए वर नामे बबन लोहकरे व 24 बी वर नामे गंगाबाई जोशी /लोहकरे व मारोतराव महादेवराव लोहकरे ,कल्पना शंकरराव लोहकरे यांच्या नावाची नोंद असल्याचे भूमि अभिलेख कार्यालय कामठीच्या आखीव पत्रिकेत दिसून येते त्यामुळे सदर जागेचा ताबा अजूनपावेतो कामठी नगर परिषद ला मिळालेला नाही या जागेच्या लीज कालावधी संपल्या नतर ताबा मिळणार व त्यानंतरच तिथे हॉस्पिटल उघडण्यात येईल असे सांगण्यात येते.

एकीकडे आरोग्य सुविधेची वणवा तर दुसरीकडे शासनाने मंजूर करून दिलेल्या जागेचा ताबा या फितशाहित नागरिकांच्या हितार्थ असलेला रुग्णालय उघडण्याचा मार्ग अडचणीत आहे तेव्हा सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून अतिशयोक्ती असलेला हॉस्पिटल उघडण्याचा मार्ग मोकळा करून नविन कामठी परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवावे अशी मागणी माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी मुख्याधिकारीला दिलेल्या निवेदनातून केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी पोलिसांची 'नार्को फ्लश आऊट'मोहीम तेजीत

Mon Oct 17 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  तीन दिवसात 46 लोकांवर कायद्याचा बडगा कामठी :- शाळा,महाविद्यालयापासुन शंभर मीटर परिसरात तंबाकू तसेच तंबाकुजन्य पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर निर्बंध आहेत तरी पण या धूम्रपान विरोधी कायद्याची सर्रास अवहेलना करीत प्रत्यक्षात आजही अनेक शाळा महाविद्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तंबाकू ,सिगारेट विक्रीची दुकाने राजरोसपणे सुरू आहेत तेव्हा नागरिकांना धूम्रपान विरोधी कायद्यांचे पालन व्हावे, विदयार्थी दशेतील तरुणाई ही नशेच्या खाईत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights