दुचाकी अपघातात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– 24 तास लोटूनही आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश,संतप्त नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन

कामठी :- आई वडील व भावासह दुचाकीने देवलापार येथील आजीच्या घरी जात असलेल्या पाच वर्षीय बालिकेचा दुचाकी अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना काल सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक बालिकेचे नाव आलीशा राजेश दहाट वय 5 वर्षे रा नया गोदाम कामठी असे आहे.तर सोबतीला असलेले आई ,वडील व भाऊ किरकोळ जख्मि झाले असून सुखरूप आहेत. आजीच्या घरी जाण्याचा उत्साहात दूचाकीने जात असता काळाने झळप घेतली व पाच वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले.तर किरकोळ जख्मि मृतक बालिकेचे आई वडील व भाऊ वर उपचार करण्यात आले.मृतक बालिकेच्या पार्थिवावर मेयो रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर ही घटना घडून 24 तासापेक्षा जास्त काळ लोटूनही या घटनेतील आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश प्राप्त झाल्याने जुनी कामठी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत पोलीस प्रशासन विरोधात रोष व्यक्त करीत आज सायंकाळी पाच दरम्यान नया गोदाम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील नागपूर जबलपूर मार्गावर मृतदेह रस्त्यावर ठेवून आरोपीच्या अटकेची मागणी करीत जवळपास अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .दरम्यान दोन्ही बाजूनी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती वेळीच मृतक बालिकेच्या कुटुंबियांसह संतप्त नागरिकांनी काही वेळ पोलीस प्रशासनाला वेठीस धरून आरोपीच्या अटकेची मागणीला जोर धरून पोलीस प्रशासन विरोधात नारेबाजी करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी प्रशांत जुमडे, प्रमोद पोरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढीत झालेल्या घटनेची निंदनीय चिंता व्यक्त करीत घटनास्थळ सह या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चा शोध घेऊन आरोपीचा कसोशीने शोध घेत आरोपीस लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याची हमी देत विश्वास संपादन केला. तदनंतर मृतक बालिकेची अंत्ययात्रा काढून नवीन मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

    -प्राप्त माहितीनुसार सदर मृतक बालिकेचे वडील राजेश दहाट हे दुचाकीने कामठी-कन्हान मार्गे सासुरवाडी गाव असलेल्या देवलापार ला जात असता जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी बाजार जवळ झालेल्या दुचाकी अपघातात मृतक बालिकेचे आई वडील व भाऊ किरकोळ जख्मि झाले तर मृतक बालिका ही जागीच मरण पावली तर या घटनेत एका भरधाव बोलेरो चारचाकी वाहनाने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली ज्यात दुचाकीवर बसलेली बालिका ही बोलेरो खाली येऊन गाडीत चिरडल्याने जागीच मरण पावली तर बोलेरो पीक अप वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले अशी चर्चा ऐकिवास येते.मात्र वास्तविक घटना ही सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रफीतीतून स्पष्ट होईल.. 

-सदर घटना घडल्याने मृतक बालिकेच्या कुटुंबात तसेच प्रबुद्ध नगर परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत यातील आरोपी वाहनचालकाचा लवकरात लवकर शोध घेऊन आरोपीस अटक करण्याची मागणी मृतक बालिकेच्या कुटुंबासह माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर, निशिकांत टेंभेकर, विनय उके, अनंता वासनीक,प्रशांत चहांदे, लक्ष्मण संगेवार आदींनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुस्लिम समाज किसी की पॉकिट में नहीं है - प्यारे खान

Tue Mar 26 , 2024
– नूरी मेहबूबिया मस्जिद में हुई अहम बैठक नागपुर :- पीली नदी, टीपू सुल्तान चौक, स्थित नूरी मेहबूबिया मस्जिद परिसर में हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेयरमैन एवं मुस्लिम समाज के वरिष्ठ प्यारे खान ने मस्जिद कमेटी के जिम्मेदारों एवं समाज के वरिष्ठों के साथ मिलकर मुस्लिम समाज की समस्याओं और मौजूदा दौर में समाज के समक्ष बनीं चुनौतियों पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com