नागपूर :- दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.