स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.28) 04 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमाननगर, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल हनुमाननगर झोन अंतर्गत रेशिमबाग चौक येथील हर्षिता कलेक्शन्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत टिमकी येथील अरुण प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत जागनाथ बुधवारी, इतवारी येथील विठठल क्लॉथ स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत निवारा सोसायटी, मनिष नगर येथील दुर्गा अंकुर अर्पाटमेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com