ठाणे :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमदार भरत गोगावले, तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनीही अभिवादन केले.