आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई, दि. 15 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला. त्यांच्या एकजूटीतून जुलमी ब्रिटिश राजवटीला हादरा दिला. आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांचे कार्य भावी पिढ्यांपर्यंत नेऊ या , असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्लास्टिक मुक्त नागपूरसाठी मनपा कर्मचाऱ्यांचा पुढाकार

Tue Nov 15 , 2022
– कापडी पिशव्यांसाठी लावलेल्या विशेष स्टॉलला मनपा कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद  – साड्या, चादरी, आदी कापडे केले भरभरून दान नागपूर :- सिंगल युज्ड प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. त्यावर कापडी पिशवी एक उत्तम पर्याय होऊ शकते. याकरिता नागपूर महानगरपालिकेने इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन आणि स्वच्छ असोसिएशन या स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून कापडी पिशव्यांना प्रोत्साहन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com