संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- केंद्रातील मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात येत असलेल्या विशेष जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून दि. २० जून ते ३० जून या कालावधीत देशातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदार संघात बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ कार्यक्रम राबविण्यात येणार असून रामटेक लोकसभा मतदार संघातील कामठी विधानसभा मतदार संघात कामठी शहरात बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आ प्रवीण दरेकर, अजय अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ बुधवार दि. 21 जुन रोजी कामठी शहरातील प्रभाग क्र.11 मधील बुथ क्र 87 मधील राजेश बुधवानी, नासिर हैदरी, इमरान हैदरी, बरकत अली यांना पत्रक देऊन करण्यात आला. याप्रसंगी भाजपा कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया ,कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल,महामंत्री उज्वल रायबोले, राज हाड़ोती, मंगेश यादव, रमेश वैद्य , विनोद संगेवार,कपिल गायधने तसेच भाजपा पदाधिकारी कमल(लालु )यादव,,जितेंद्र खोब्रागडे, पुष्पराज मेश्राम, योगेश गायधने,चंद्रकांत सिरिया, पंकज वर्मा,प्रतिक पडोले,विजय कोंडूलवार,अजीज हैदरी, वसिफ अंसारी,संगीता अग्रवाल, प्रेमलता शर्मा ,पत्रकार नितिन रावेकर, निलेश रावेकर,वाजिद अली यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. परिसरातील घरी सदिच्छा भेटी देऊन गेल्या ९ वर्षातील मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना दिली व त्यांना माहिती पुस्तिकेचे वाटप केले.