नागपूर :- मुत्सद्दीपण, दूरदृष्टी, ज्ञानलालसा, प्रजावात्सल्यता, न्यायदान, संरक्षणव्यवस्था, राजकारभाराचे कौशल्य, कर्तव्यकठोरता, बाणेदार, उच्च चरित्र्य, साधेपणा आदि गुणांसह विनयशीलता ज्यांच्या नसानसात भिनलेली होती व प्रशासकीय कौशल्याने ज्यांचे आजही नाव घेतले जाते अश्या खंबीर व्यक्तिमत्वाच्या धनी अहिल्यादेवी यांचा जन्म 31 मे, 1725 रोजी महाराष्ट्रातील बिड जिल्हयातील चौंडी या गावी शिंदे घराण्यात झाला. वयाच्या आठव्या वर्षी इंदूरच्या होळकर घराण्याच्या सून झालेल्या अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वाने राज्यात अनेक प्रशासकीय सुधारणा करुन उत्तम राज्यव्यवस्था उभी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आज 31 मे (शुक्रवार) नागपूर महानगरपालिके तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करुन आदरांजली दिली.
यावेळी उपायुक्त गजेंद्र महल्ले, सहा. आयुक्त महेश धामेचा, सहा. अधिक्षक राजकुमार मेश्राम वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, डॉ. गोवर्धन नवखरे, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, विनय बगळे, अभय बुराडे, अमोल तपासे, राजेश लोहितकर, परिमल इनामदार, विनोद डोंगरे आदी मनपाचे मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.