संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मतदारांच्या न्यायिक समस्या मार्गी लावण्याचे तेथील लोकप्रतिनिधींचे मुख्य कर्तव्य आहे याचं कर्तव्याची जाण ठेवत नागपूर जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाडे यांनी दर शनिवारला जनसंवाद शिबिराचे आयोजन केले . यानुसार आज शनिवारी सभापती प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी जनतेच्या समस्या सोडिण्यासाठी जनसंवाद शिबिर घेतले ज्यामध्ये नागरिकांच्या विविध समस्यांची जाण घेत त्यांच्याशी संवाद साधून विविध विषय मार्गी लावले ज्यामुळे उपस्थित समस्याग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या जनसंवाद सभेत नवीन शिधापत्रिका तयार करून देण्यात आले. राशन कार्डची आरसीआयडी क्रमांक देण्यात आले. यानुसार नागरिकांनी घेऊन आलेल्या जनतेच्या समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या शिबिराला शेकडो च्या वर नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी या जनसंवाद शिबिरात कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आशिष मललेवार प्रामुख्याने उपस्थित होते.