नागपूर : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंह गर्जना करणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वतंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहायक जनसंपर्क अधिकारी राजेश वासनिक आदी उपस्थित होते.