नागपूर :- प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
उपायुक्त आशा पठाण यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.