संविधानाचे महत्व व बाबासाहेबांचा जिवन परिचय उलगडणारे छायाचित्र प्रदर्शन – माहिती आयुक्त राहुल पांडे

विद्यार्थी व नागरीकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरचा उपक्रम

नागपूर :-दुर्मिळ छायाचित्रांद्वारे संविधानाच्या निर्मितीचा इतिहास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाविषयीची माहिती सांगणारे “भारताचे संविधान व महामानवाचा जीवन प्रवास” छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरीक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला आवर्जुन भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, पत्र सूचना कार्यालय, नागपूर आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, नागपूर, सहाय्यक आयुक्त कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी मार्गावरील सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात आयोजित “भारताचे संविधान व महामानवाचा जीवन प्रवास” या विषयावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे, प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे उप संचालक शशीन राय, केंद्रीय संचार ब्युरोच्या क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे प्रभारी सहाय्यक संचालक हंसराज राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. 

जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे म्हणाल्या, दुर्मिळ छायाचित्राद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन प्रवासाची माहिती नागरीकांना उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन नियमितपणे लावणे आवश्यक आहे. नागरीकांनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन संविधान व बाबासाहेबांच्या जिवन प्रवासाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा म्हणाले, संविधानाचे महत्व सांगण्यासाठी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन प्रवासाची माहिती सांगणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, नागपूर यांनी चांगला उपक्रम राबविला आहे. माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे सहायक संचालक हंसराज राऊत यांच्या हस्ते माहिती आयुक्त राहुल पांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना भारताचे संविधान प्रास्ताविकाचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

सदर प्रदर्शन ८ डिसेंबर 2022 पर्यत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शन नागरीकांसाठी निःशुल्क असून नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, नागपूर, पत्र सूचना कार्यालय, नागपूर आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, नागपूर, सहाय्यक आयुक्त कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरो, महाराष्ट्र-गोवा राज्याचे अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा, उपसंचालक निखील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, सहाय्यक प्रचार अधिकारी/तांत्रिक सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छकायला, संतोष यादव यांच्यासह इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कैट नागपुर द्वारा डिजिटल अर्थव्यवस्था और बैंकों से संबंधित कार्यशाला

Wed Dec 7 , 2022
नागपूर :-युवा बदलते युग में जिस तरीके से खरीदारी करता है उसी को ध्यान में रखते हुए केंद्र सरकार और रिजर्व बैंक ऑफ इंडिया डिजिटल करंसी और ऑनलाइन व्यापार के बारे में तैयारी कर रही है। इसी बात को ध्यान में रखते हुए टीम कैट नागपुर व महिला समिति शुक्रवार 9 दिसंबर को कैट के सभागृह चौथा माला सदोदय बिल्डिंग, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com