मुंबई :- प्रत्येक पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच गरीब, गरजू लाभार्थींना विनासायस शिधापत्रिका देखील दिल्या जाव्यात, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिले.
मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने रेशन दुकानाच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. मंत्री श्री. भुजबळ यांनी या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या शिष्टमंडळात आमदार विनोद निकोले, संघटनेच्या प्राची हतिवलेकर, केरळच्या माजी मंत्री मरियम ढवळे, नसीमा शेख, रेखा देशपांडे, पी.के श्रीमंती यांचा समावेश होता