प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत धान्य पोहोचवावे – मंत्री छगन भुजबळ

मुंबई :- प्रत्येक पात्र लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच गरीब, गरजू लाभार्थींना विनासायस शिधापत्रिका देखील दिल्या जाव्यात, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिले.

मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने रेशन दुकानाच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. मंत्री श्री. भुजबळ यांनी या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या शिष्टमंडळात आमदार विनोद निकोले, संघटनेच्या प्राची हतिवलेकर, केरळच्या माजी मंत्री मरियम ढवळे, नसीमा शेख, रेखा देशपांडे, पी.के श्रीमंती यांचा समावेश होता

NewsToday24x7

Next Post

मौन ही एक उपचार पध्दती आहे - डॉ. सूर्यकांत पाटील

Thu Sep 14 , 2023
– विद्यापीठात विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रम संपन्न अमरावती :- मौन ही एक उपचार पध्दती असल्याचे प्रतिपादन डॉ. सूर्यकांत पाटील यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या पदव्युत्तर पदविका निसर्गोपचार व योगशास्त्र व पदव्युत्तर पदविका योगा थेरपी अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांंकरीता विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील होते. पुढे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com