हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी २० जून पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :- केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता दि.२० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त एम.जे. प्रदिप चंदन यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा आणि वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडून दि. २० जून २०२३ पर्यंत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. २० जून २०२३ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्त प्रदीप चंदन यांनी दिली आहे.

NewsToday24x7

Next Post

तीन दुचाकी चोरट्याना अटक

Wed Jun 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील सिटी हॉस्पिटलच्या पार्किंग मधून उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मुलाने ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती .यासंदर्भात फिर्यादी देवीदास खेरगडे वय 38 वर्षे रा प्रेमनगर निमखेडा ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com