● बालदिन: लहान मुलांनी त्यांच्या पालकांसह मेट्रो राईड केली
● मोठ्या प्रमाणात खेळणी एकत्रित
नागपूर :- सोमवारी बालदिनानिमित्त चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटला. याशिवाय मूकबधिर शाळा आणि मुलांची शाळा या मुलांनी मेट्रोचा प्रवास केला.
परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या सायकल चालवून आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे मूकबधिर शाळेतील मुलांनी पहिल्यांदाच मेट्रो ट्रेनमधून प्रवास केला. मुलांच्या सोबत पालक आणि शिक्षक देखील मेट्रो प्रवासात सहभागी होते.
गतवर्षी महामेट्रोच्या वतीने बालदिनानिमित्त झिरो माईल स्थानकावर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वर्षी मुलांनि मेट्रोने प्रवास केला. बालदिनानिमित्त महामेट्रोच्या वतीने दुर्बल घटकातील मुलांसाठी विविध मेट्रो स्थानकांवर खेळणी दान उपक्रम राबवला होता. अश्या प्रकारे एकत्रित झालेले खेळणे सोनू अग्निहोत्री कर्ण बधिर शाळेच्या विद्यार्थ्यांना मेट्रो अधिकाऱ्यांनी वितरित केले. विशेष म्हणजे दिवाळी सणात महा मेट्रोतर्फे कपडे व साहित्याचे वाटप करण्यात आले होते. या कामाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने बालदिनानिमित्त ‘खेळणी दान’ हा उपक्रम राबवला होता.