भंडारा, दि. 14 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन दिनांक 1 ते 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पावसाच्या परिस्थितीनुसार पर्यटन रस्त्यांची स्थिती पाहून ऑफलाईन पध्दतीने सुरू करण्यात आले होते. या वर्षात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पर्यटन रस्ते सुस्थितीत नसून त्यांची दुरूस्ती करण प्रस्तावित होते. पावसाच्या परिस्थितीनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन रस्तांची स्थिती पाहून 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत नागझिरा व नविन नागझिरा अभयारण्यासाठी पिटझरी, चोरखमारा-1 व 2, मंगेझरी प्रवेशद्वार, कोका अभयारण्यासाठी चंद्रपूर प्रवेशद्वार व नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकरीता बकी व जांभळी प्रवेशव्दारावरून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने व सुस्थितीतील निवडक रस्त्यांनेच पर्यटन सुरू करण्यात आलेले आहे.
1 नोव्हेंबर 2022 पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही काही रस्त्यांची पुर्णपणे डागडुगी झाली नसल्याने उपरोक्त पर्यटनाकरीता केवळ जिप्सी पर्यटन वाहन किंवा खाजगी वाहनामध्ये जमिनीपासून उंच असलेले वाहन (SUV वाहने, स्कॉपीओ, जिप इत्यादी) वाहनास पुढील आदेशापर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया जयरामेगौडा आर यांनी कळविले आहे.