अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत सहवनक्षेत्र नियत क्षेत्र मुंडीकोटा मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली झुडपी वनविभाग येथे जेसीबीच्या साह्याने मुरूम खोदकाम करून टिप्परच्या साह्याने वाहतूक करीत असल्याचे विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 ऑक्टोंबर ला सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा येथे सर्व वनपरिक्षेत्र कर्मचारीसह मिळून मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली झुडपी वन विभागाच्या विभागामध्ये गेले असता सदर ठिकाणी पिवळ्या रंगाची जेसीपी खोदकाम करीत होते.जेसीबीच्या साह्याने पिवळ्या रंगाच्या टिप्पर खोदकाम केलेले मुरूम भरून वाहतुक करतानाच वनविभागाच्या कर्मचारी यांनी पकडले असता गाडी चालक हा गाडी चालु ठेऊन पळ काढला.त्याचा पाठलाग केला परंतु ते सापडला नाही. टिप्पर क्रमांक MH 40 Ak 6323 व जे.सी.बी. व जेसीबी क्रमांक MH 36 L 4949 या दोन्ही गाडीचे मालक कैलाश निशाने सदर ठिकाणी येऊन गाडीच्या चाब्या वनविभागाचे कर्मचारी यांच्याकडे दिल्या सदर जागेवरून मुरूम खोदल्या प्रकरणी वनविभागाने कारवाई करिता दोन्ही वाहने वनविभागाच्या कार्यालय तिरोडा येथे जप्त करण्यात आले.सदर कारवाई वनविभागाचे कुलुराज सिंग उपवनरक्षक गोंदिया यांच्या राजेन्द् सदगीर सहायक वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आर. जी. मून वनपरीक्षेत्र अधिकारी तिरोडा, क्षेत्र सहाय्यक एस.जी. पारधी यांच्या सह वनविभागाच्या कर्मचारी यांनी केले आहे.