भंडारा :- विकसीत भारत संकल्प यात्रेतुन जिल्हयातील ग्रामीण भागात केंद्र शासनाच्या 17 योजनांचा प्रसार-प्रचार व त्या योजनांपासून वंचीत लाभार्थ्यांसाठी त्या योजनांचे लाभ कसे घ्यावे याबाबत नियुक्त नोडल अधिका-यांनी नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी आज नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी ,पोलीस अधिक्षक लोहीत मतानी तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हयात ज्या ठिकाणी विकसीत भारत यात्रा जात आहे.तेथील नागरिकांना यात्रेच्या नियोजीत दिवसापुर्वी गावात दवंडीमार्फत प्रचार प्रसीध्दी करण्यात यावी अश्या सूचना मेंढे यांनी यावेळी दिल्यात.
या यात्रेच्या माध्यमातुन नॅनो युरीया वापरण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करणे ,तसेच आयुष्यमान कार्ड व जलजीवन मिशन बाबत माहिती तळागाळापर्यत पोहोचविणे अपेक्षीत असल्याचे मेंढे यांनी सांगितल.