स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आज २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपआयुक्त रवींद्र भेलावे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. त्यांनी देशासाठी अनेक वर्षे तुरुंगवास देखील भोगला होता.स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. यावेळी सहायक संचालक नगर रचना सुनील दहीकर,विधी अधिकारी अनिल घुले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामपूर गावात डेंग्यू सर्व्हेक्षणव्दारा नागरीकांची तपासणी

Tue May 28 , 2024
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील रामपूर गावामध्ये दिनांक २३ मे २०२४ ला डेंग्यू संशयीत रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाव्दारे गावात डेंग्यू आजाराकरीता स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांव्दारे गृहभेटीचे नियोजन करून गावात डेंग्यू सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात आली. सदर सर्व्हेक्षणाव्दारे डेंग्यू संशयीत रुग्णांचे रक्त नमूने संकलन करून ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे तपासणी केली असता २७ मे २०२४ अखेर १८ रुग्ण डेंग्यू NS1 तपासणीत दुषीत आढळून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com