मुंबई :-इतर मागास बहुजन कल्याण (ओबीसी) विभागामार्फत 2018 पासून विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता आ.प्रवीण दटके यांनी आवाज उठवला.
यावेळी दटके यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले.
1) 13 ऑक्टोबर 2022 रोजी या विषयातला शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामध्ये विधी, वाणिज्य, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचा समावेश आहे , त्यानुसारच मेडिकल विद्यार्थ्यांचाही शिष्यवृत्तीत समावेश करावा.
2) २०१८ पासून आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना यश शिष्यवृत्तीचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला ?
3) फक्त 50 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्याचा शासन निर्णयात उल्लेख आहे.ही संख्या अतिशय कमी आहे , त्यामुळे, या संख्येत 500 इतकी वाढ करणार का ?
4) लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येकी किती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते याची माहिती सभागृहाला देणार का ?
यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक उत्तर देत शिष्यवृत्ती धारकांची संख्या 50 वरून 500 टप्या टप्याने करू तसेच, मेडिकल विद्यार्थ्यांचाही समावेश करून जास्तीत जास्त लाभ देणार असल्याचे दटके यांना आश्वासित केले.