कढोलीत ट्रक पलटल्याने ट्रकचालकाचा जागीच मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 19:-स्थानिक मौदा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील कढोली गावाच्या महामार्गावरून केळी ने लादून भरलेले साहित्य नागपूर कडे वाहून नेत असता ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटल्याने घडलेल्या गंभीर अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक क्लिनर किरकोळ जख्मि झाल्याची घटना आज सकाळी 7 दरम्यान घडली असून मृतक ट्रकचालकाचे नाव मो अश्फाक अब्दुल जब्बार रा अचलपूर जिल्हा अमरावती असे आहे.
घटनेची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपुर च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी अपघाती ट्रक क्र एम एच 27 बी वाय 6555 जप्त करून घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त साहित्य वाटप

Thu May 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19- अमरावतीच्या  ॲड. यशोमती ठाकूर ( मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन) यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवार दिनांक १८ मे २०२२ रोजी युवा जनकल्याण मित्र परिवारा तर्फे कामठी येथील कस्तुरचंद डागा बाल सदन येथे चिमुकल्या अनाथ मुलांना नोटबुक,पेन,फळ,खाऊ आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. ॲड. यशोमती ठाकूर ह्या सुपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या धनी असून त्यांची लोकप्रियता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com