संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पारशीपुरा मैदानाजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी काल रात्री 9 दरम्यान यशस्वीरीत्या धाड घातली असून या धाडीतून जुगार पत्ते, पेन, दरी,मोबाईल व नगदी 8010 रुपये असा एकूण 28 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या धाडीतून एकूण आठ जुगाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यातील सहा आरोपी ताब्यात असून दोन आरोपी पसार आहेत.
ताब्यात असलेल्या सहा आरोपी मध्ये अक्षय दिलीप लोखंडे वय 24 वर्षे रा गवळीपूरा कामठी,हिरालाल हरणे वय 59 वर्षे रा मोंढां,कामठी,अभिषेक ससानकर वय 35 वर्षे रा मोंढां,नईम शेख अस्मत अली वय 28 वर्षे रा लकडगंज कामठी ,शेख मोटू लतीफ शेख वय 35 वर्षे रा गवळीपूरा,सोमेश्वर हिवसे वय 35 वर्षे रा मोंढां कामठी चा समावेश आहे तर पसार दोन आरोपी मध्ये मो अकरम जमिल अख्तर वय 51 वर्षे तसेच मो साजिद उर्फ छंगरा जमिल अखतर वय 38 वर्षे रा बुनकर कॉलोनी कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी पाच चे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनार्थ सहकारी पोलीस पथकाने केले .