– पोलीस स्टेशन सावनेर यांची कारवाई
सावनेर :- अंतर्गत वेलकम लॉज न्यू गुजरखेडी सावनेर येथे दिनांक ०७/०८/२०२३ से १३.१५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील पोलीस स्टाफ यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, आरोपी नामे १) तपन दत्तात्रय रूषीया वय २८ वर्ष २) धिरज दत्तात्रय रूषीया, वय ३२ वर्ष ३) रजत दत्तात्रय रूषीया, वय ३१ वर्ष वरील १ ते ३ रा. मानकर पेट्रोल पंप, राधाकृष्ण हॉल समोर मेश्राम यांचे घरी किरायाने ता. सावनेर ४) प्रणय विनोद गुडपे, वय २३ वर्ष रा. ईसापुर ह. मु. पाटणसांवगी ता. सावनेर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकारीता मुलींना पैशाचे आमिश देवुन देहव्यापारास प्रवृत्त करून त्यांना ग्राहकांना पुरवुन नमुद ठिकाणी येण्यास सांगुन तेथे देह व्यापारास जागा उपलब्ध करून देऊन पिडीत मुलींना ग्राहकास पुरवुन देहव्यापार करवुन घेतात. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टॉफ यांनी गुप्त माहिती व्दारे लॉज चेकिंग करीता गेले असता वेलकम लॉज न्यू गुजरखेडी येथे पाश्चिम बंगाल येथून आलेल्या दोन मुलीचे लॉजच्या रजिस्टरवर नोंद चेक केली असता यातील आरोपी क्र. ४ हा लॉज मधुन संशयीत पळुन गेल्याने यातील पिडीत मुलींना घटनास्थळी विचारपुस केली असता त्यांनी आरोपी क्र. १ व २ यांनी वेश्याव्यवसाय करिता वेलकम लॉज येथे पुढील १० दिवसा करिता ठाणे शहर येथून बोलवण्यात आले आहे. असे सांगितल्यावरून स्टॉफ यांनी घटनेची शहानिशा केली असता वर नमुद पिडीत महिलांना वेश्याव्यसाय चालविण्या करीता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आणुन पिडीतांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले असुन रजत दत्तात्रय रूपीया याने भाडे तत्वावर चालवत असलेल्या वेलकम लॉजची रूम नंबर १०३ यांचा कुंटणखाना म्हणुन वापर करणार आहे माहीती असतांना तो वापरण्यास हेतुपुरस्पर परवानगी दिली असून आरोपी क्र. ४ याने पिडीतेला अनैतिक संबंध प्रस्थापित करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे- सहायक पोलीस निरीक्षक मंगला मोतीराम मोकाशे, पोलीस स्टेशन सावनेर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीतांविरुध्द कलम ३(2) (a), ५(१) (क), (ग), (म), स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार अधिनीयम १९५६ (सिट अधिनियम पुननिर्मित) कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपी क्र. १), ३), ४) यांना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भस्मे पोस्टे सावनेर हे करीत आहे.