अतिउत्कृष्ट सेवा पुरस्काराने गजभिये सन्मानित

नागपूर :- रेल्वे सुरक्षा बलातील सहायक उपनिरीक्षक (एएसआय) शशिकांत गजभिये यांना अतिउत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजनी येथील क्रीडा मैदानावर झालेल्या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

गजभिये यांनी 33 वर्षे निष्कलंक सेवा दिली आहे. या काळात कर्तव्य बजावण्यासह त्यांनी भटकलेल्या अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून आणून देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या गुन्हेगारांच्या मुसक्याही त्यांनी आवळल्या. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले. जीव धोक्यात घालून प्रवाशांना वाचविले. हे योगदान लक्षात घेत गजभिये यांना महाव्यवस्थापक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेच्या अजनी येथील क्रीडा मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात गजभिये यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवारातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेस प्रारंभ

Fri Aug 18 , 2023
– वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी गोळ्या घेत केली जनजागृती – ३१ ऑगस्ट पर्यंत चालणार अभियान नागपूर :- व्यक्ती कुठल्याही आजारापासून बरा होऊ शकतो, असा विश्वास नेहमी व्यक्त करणारे डॉक्टर रुग्णाचे मनोबल वाढविण्यासह त्यांच्या आजारावर उपचार करून त्याला बरं करण्यात जितके पुढे आहेत, तितकेच ते आजारांविषयी जनजागृतीही पुढाकार घेतात हे नागपूर महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी दाखवून दिले. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com