– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई
नागपूर :- दिनांक १२/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मोटर सायकल बोरीच्या गुन्ह्यांचे अनुषंगाने गुप्त बातमीदारा कडून एका संशयित इसमाबद्दल महिती प्राप्त झाली. गोपनिय माहीतीच्या आधारे संशयीत इसम नामे करण गणेश उके, वय १९ वर्ष, रा. चांगदेव नगर, खामला, नागपुर यास पथकाने सापळा रचून इसमास ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातून चोरी केलेली एक काळया रंगाची बिना क्रमांकाची बुलेट मोटर सायकल किं. ७०,०००/- रु जप्त करून आरोपीची वैद्यकिय तपासणी करुन जप्त मुद्देमाल व कागदपत्रांसह पोलीस ठाणे MIDC बोरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील दोन मोटर सायकल चोरीचे गुन्हे उमडकीस आलेले आहेत. १) पोलीस ठाणे MIDC बोरी अप. क्र. १८४/२४ कलम ३७९ भा.द.वि. २) पोलीस ठाणे बोरी अप. क्र. ५०५/२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता.
सदरची कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (प्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (प्रा) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरिक्षक आशिष मोरखडे, सफौ मिलिंद नांदुरकर, महेश जाधव, पोहवा मयूर डेकळे, अमृत किनगे, रोहन डाखोरे, पोना सतीश राठोड यांनी पार पाडली.