सिडको प्रदर्शनी केंद्रातील बॉयलर इंडिया 2024 चे तीन दिवसीय प्रदर्शन आज संपन्न

नवीमुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया 2024 प्रदर्शन, चर्चासत्र व कार्यशाळेला नागरिक, विद्यार्थी आणि उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते दि.25 सप्टेंबर रोजी उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनात इटली, युके, जर्मनी, चीन, स्वीडन, बेल्जीयम, नेदरलँड या देशासह सुमारे 260 उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य यांची मांडणी येथे आहे.

तीन दिवसीय प्रदर्शनात आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी सेमीनार मध्ये जवळपास 500 अभ्यागंतानी भेटी दिल्या. त्यामध्ये विविध कॉलेजचे विद्यार्थी व लेक्चरल तसेच विविध कंपन्यामधील मॅनेजर, इंजिनिअर, बाष्पके परिचर इत्यादी उपस्थित होते. तसेच दिपक फर्टिलायझर्स ॲन्ड पेट्रोकेमिकल लि,तळोजा, थायसनबग्रूप, इंडास्ट्रिज प्रा.लि.पुणे, राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स लि.चेंबूर, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि,माहूल, फोबर्स मार्शल प्रा.लि. पुणे, टीकेआयएल इंडिस्ट्रियल प्रा.लि.आदीना सहभाग होता. त्याच प्रमाणे एमएच साबो सिध्दिविनायक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मुंबई, गर्व्हनमेंट पॉलिटेक्निकल,ठाणे, गर्व्हनमेंट पॉलिटेक्निकल, कोल्हापूर, राजाराम बापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नालॉजी इस्लामपूर, जि.सांगली, एम सरोदे इंजिनिअरींग कॉलेज बीड यांनी या प्रदर्शन चर्चासत्रात सहभाग नोंदविला.

या चर्चासत्रात प्रदर्शन कामगार सुरक्षेला प्रोत्साहन देणारे आहे व बाष्पकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा हे सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले . या तीन दिवसीय चर्चासत्रात तज्ज्ञाचे मार्गदर्शन लाभले. हे चर्चासत्र व प्रदर्शन कामगार सुरक्षेला प्रोत्साहन देणारे आहे व बाष्पकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा हे सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे. बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा, बाष्पक, हीट एक्सचेन्जर, प्रेशर व्हेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यामांतून कौशल्य विकास व रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरले आहे.

उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभाग योगदान देत असून उद्योगांना सर्वसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची सुलभता, कामगारांची सुरक्षितता व कामगार हित या त्रिसूत्रीची अमंलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. उद्योग व कामगार विभाग हे एकत्र काम करत आहेत. बॉयलर हा सर्व उद्योगांचा महत्त्वाचा घटक आहे.

वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस बॉयलर इंडिया 2024 प्रदर्शन, चर्चासत्र भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाची सांगता आज झाली असे बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी जाहीर केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसहभागातून साध्य होईल उद्यानांचा विकास - मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे प्रतिपादन

Sat Sep 28 , 2024
– “उद्यान मित्र” संवाद कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 नागपूर :- दैनंदिन जीवनात उद्यानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. उद्यान हे सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग झाले आहेत. उद्यानांसह पर्यावरण संवर्धनासाठी मनपा निरंतर कार्यरत आहे. उद्यानांच्या विकासासाठी प्रशासनाला आता उद्यान मित्रांची साथ मिळणार असून, लोकसहभागातून उद्यानांचा अधिक विकास साध्य होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. मनपाच्या उद्यान व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com