मनीषा मोहोड यांना पीएच.डी. प्रदान

नागपूर :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे मनीषा सुभाष मोहोड यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी ‘मुद्रित माध्यमातील व्यावसायीकरण आणि वृत्तपत्रांच्या बदलत्या भूमिका : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर आणि जळगाव येथील मु.जे. महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. उज्वला भिरूड नेहेते यांनी मार्गदर्शन केले.

मनीषा मोहोड या बारा वर्षे मुद्रीत माध्यम तसेच डिजिटल मिडीयात कार्यरत आहेत. मनीषा नागपूर येथील ॲड. अल्केश यादवराव येरखेडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबासह पीएचडी मार्गदर्शक आणि सहकारी मिञपरिवाराला दिले

NewsToday24x7

Next Post

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात “अमोघ उर्जा-२०२४ फार्मा युथ फेस्टीव्हल” या ३ दिवसीय कार्यक्रमाचे मोठ्या थाटात उद्घाटन

Thu Feb 1 , 2024
नागपूर :- दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा येथे ३ दिवसीय (दि. २७ ते २९ जानेवारी २०२४) “फार्मा युथ फेस्टीव्हल अमोघ उर्जा-२०२४” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आज दि. २७/०१/२०२४ ला सुप्रसिद्ध गायक श्री निरंजन बोबडे आणि सहगायक पार्वती नायर यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन पार पडले. यावेळी मंचावर अंबे दुर्गा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज बालपांडे, व्यवस्थापक प्रतिनिधी  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com