फुटबॉल कुंभामध्ये गडकरींची उपस्थिती

नागपुर :- खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत उत्तर नागपुरातील एन. डी. एफ. ए. चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल ग्राउड येथे सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत आज नागपुरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. त्यांच्या येण्याने उत्तर नागपुरात फुटबॉल ग्राउंड वर उपस्थित असलेल्या फुटबॉल प्रेमींनी त्यांचे जोरदार स्वागत केले.या प्रसंगी नितीन गडकरी यांचे स्वागत फुटबॉल स्पर्धेचे एन. डी. एफ. ए. अध्यक्ष हरीश वोरा, सचिव इकबाल काश्मिरी, समन्वयक सरदार नवणीतसिंग तुली, दीपक अरोरा, दिपांकर पाल, राजू भामरा, प्रकाशराव (गुंडू राव), संजय चौधरी, मोइंन खान यांनी केले. या प्रसंगी नागपुर नागरिक बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, सुधीर दिवे, डॉ. पीयूष अंबुलकर, डॉ. प्रवीण डबली प्रामुख्याने उपस्थित होते.

आज यंग मुस्लिम फुटबॉल क्लब विरुद्ध यंग अन्सार फुटबॉल क्लब कामठी मध्ये उपांत्य सामना झाला. गडकरींनी या वेळी सामना बघून व्यावस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी या वेळीं फुटबॉल स्टेडियम मधील सुविधांचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सामना टाय ब्रेकर मध्ये यंग अन्सार कामठी यांनी 6 – 5 ने विजय नोंदविला. उद्या दुपारी 3 वाजता यंग अन्सार विरुद्ध सिकरसा नागपुर मध्ये होईल.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM distributes 71,000 appointment letters under Rozgar Mela via video conferencing

Sat Jan 21 , 2023
Interacts with new appointees “Regular Rozgar Melas have become a mark of this government” “In central jobs, the recruitment process has become more streamlined and time-bound” “Transparent recruitment and promotions generate trust among the youth” “Serve with a service attitude as  ‘Citizen is Always Right’” “Self-learning through technology is an opportunity for today’s generation” “Today’s India is witnessing fast growth […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com