नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवार आणि सोमवार (ता.१९ व २०) ०८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पंजाब डिझेल,वाडी,नागपूर यांच्यावर रस्त्यालगत वर्कशॉपचे साहित्य पसरविल्या प्रकरणी कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे.लाझीझ चीकन सेंटर,रामनगर चौक,नागपूर यांच्यावर चेंबर बाधित करून त्यात दुकानातील कचरा चेंबर व रस्त्यालगत टाकल्या प्रकरणी कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. के सी कन्स्ट्रक्शन ,काटोल रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकल्या प्रकरणी कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्पेस बिल्डर, नरेंद्र नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकल्या प्रकरणी कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जोधपुर मिस्टान, गांधीबाग नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पौनीकर कोल्थ स्टोर, राणी दुर्गावती चौक,नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मे. आशिष सोनपापडी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. भारत फूड,कळमना मार्केट,नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.