फ्रेन्ड्स क्लब, युनिक गर्ल्सलस अजिंक्यपद, खासदार क्रीडा महोत्सव : हँडबॉल स्पर्धा

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील हँडबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना नमवून फ्रेन्ड्स क्लब आणि युनिक गर्ल्स संघाने पुरूष व महिला गटात अजिंक्यपद पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शनिवारी (ता.20) रात्री स्पर्धेची अंतिम लढत झाली.

पुरूष खुल्या गटात फ्रेन्ड्स क्लबने क्रीडा प्रबोधिनी संघाला 20-15 अशी मात देत विजेतेपद जिंकले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात कोंढाळीच्या अजिंक्य क्लबने विजय मिळविला. महिला खुल्या गटातील अंतिम लढत युनिक गर्ल्स विरुद्ध फ्रेन्ड्स क्लब यांच्यात झाली. अटीतटीच्या सामन्यात युनिक गर्ल्स संघाने 16-12 ने फ्रेन्ड्सचा पराभव करीत विजेतेपदाचे चषक उंचावले. महिलांतील तिसऱ्या स्थानाच्या सामन्यातही अजिंक्य क्लबने बाजी मारली.

17 वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या अंतिम लढतील लखोटीया हायस्कूल संघाने लखोटीया सीबीएसई संघाचा 25-22 ने पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. तर मुलींमध्ये केंद्रीय वि‌द्यालय संघाने लखोटीया कोंढाळी संघाचा 10-7ने पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात मुलांमध्ये केंद्रीय वि‌द्यालय व मुलींमध्ये संस्कार वि‌द्या सागर संघ विजयी झाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भव्य शोभायात्रेने श्री शिव महापुराण कथा व राधानाम चा शुभारंभ

Tue Jan 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- तिळ संक्रांत चतुर्थी महोत्सवा निमित्य श्री शिव महापुराण समिती व्दारे पांधन रोड गणेश मंदीर सामोरील प्रागणात श्री शिव महापुराण कथा व श्री राधानाम रस प्रवाहचे भव्य शोभायात्रा व्दारे शुभारंभ करून (दि.२१) जानेवारी ते (दि.१) फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकानी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष राजु […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com