दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण

यवतमाळ :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची मान्यता आहे. या संस्थेत चालू शैक्षणिक वर्षाकरीता मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संस्थेतील सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 8 वी पास, मोटार अॅन्ड आमेंचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स) या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी किमान ९ वी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष असावी. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असून फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना संस्तेत प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना इत्यादी सोई व सवलती आहे.

प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ मिरज, जिल्हा सांगली येथे उपलब्ध आहे. अधिक माहिती 0233-2222908, 9922577561, 9595667936 नंबरवर सुध्द उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पुर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत.

प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशिट व प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, युडीआयडी कार्ड, अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखल्याच्या झेरॅाक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येणार असल्याचे शासकीय पौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाचे अधिक्षकांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 85 प्रकरणांची नोंद

Sat Jul 13 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई    नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 12) रोजी उपद्रव शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 97 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com