मुंबई :- बहुमताच्या लाटेवर स्वार होत आज महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ होत आहे. आज 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा नेत्रदीपक शपथविधी सोहळा मुंबईत होत आहे. आझाद मैदान त्यासाठी सजलं आहे. राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. या ग्रँड शपथविधीसाठी लाडक्या बहिणींपासून ते चहावाला आणि अनेक दिग्गजांना आमंत्रण धाडण्यात आले आहे. विरोधी पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांना आणि शिलेदारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आज भाजपाच्या गटनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतील. पण इतरांचा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे याविषयीचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.