नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

नागपुर /केळवद –  सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, पोलीस स्टेशन केळवद जि. नागपूर ग्रामीण येथे फिर्यादी नामे- सतिश  प्रकाश  आढे, वय 30 वर्ष, रा. खुरजगाव पो. मंगसा ता. सावनरे जि. नागपूर यांनी तक्रार दिली की, त्यांची पत्नी हीला WCL तसेच SBI  बॅक मध्ये लिपीक पदावर नौकरी लावून देण्याचे आमिष देवून त्यांच्या कडून 10,00,000/-रू. ची मागणी करून 5,85,000/-रू. घेवून त्यांना व्यवस्थापनाचे बनावटी खोटे नेमणूक पत्र तयार करून ते फिर्यादी ची फसवणूक करण्याचे उददेशा ने फिर्यादीला खरे असल्याचे सांगून वेळोवेळी फिर्यादी व त्याच्या पत्नीला WCL कार्यालयात तसेच SBI व्यवस्थापनाचे कार्यालय दिल्ली व SBI शाखा सिडको औरंगाबाद येथे वारंवार बोलावुन त्यांना नौकरी न देता व त्यांच्या कडुन 5,85,000/-रू. घेवुन तिचा गैरवापर घेवुन फसवणुक केली. अशा  प्रकारे फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट घेवुन चौकशी अंती अप क्र. 09/22 कलम 420, 467,468,471,120(ब) नुसार आरोपी क्र. 1. षिल्पा राजीव पालपर्थी, 2. अमित मारोती कोवे व 3. रमेश  नथ्थुजी कामोने तिन्ही रा. नागपूर यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद असुन तपास आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथे सुरू आहे. सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासामध्ये यातील आरोपी व त्याचे इतर मुख्य सहकारी यांनी आणखी बरेच बेरोजगार नागरीकांची अशा प्रकारे फसवणुक केल्याची बाब निर्देशानात येत आहे. तरी सर्वनागरीकांना या व्दारे आव्हान करण्यात येते की, त्यांची WCL / SBI मध्ये किंवा इतर प्रकारे नौकरी चे आमिश देवुन नमुद आरोपी व त्यांचे इतर मुख्य सहकारी यांनी पैसे घेवून फसवणुक केली असल्यास आपल्याकडे असलेल्या संपुर्ण पुरावे/माहिती/दस्तावेज घेवुन पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण कार्यालय सिव्हील लाईन्स नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उपपोस्टे,झिंगाणुर येथे कबड्डी स्पर्धा 2022 चे आ योजन १० संघाचा सहभाग,वडदेली संघानी मारली बाजी विभागीय स्पर्धेसाठी खेडाळुंची निवड

Mon Feb 21 , 2022
गडचिरोली – दि. २०/०२/२०२२ रोजी उप पोस्टे झिंगाणुर येथे पोलीस अधिक्षक गडचिरोली  अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंढे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख साहेब, अपर पोलीस अधीक्षक(अहेरी)  अनुज तारे साहेब यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी  सुहास शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वीर बाबुराव शेडमाके कबड्डी भव्य स्पर्धेचे आयोजन केले. सदर स्पर्धेमध्ये पोस्टे हद्दीतील एकूण १० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!