राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 49 कोटी मुल्याची 27 हजार प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये आज 11 फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 2789 प्रलंबीत व 24 हजार 296 वादपुर्व अशी एकूण 27 हजार 85 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य रू. 49 कोटी 59 लाख 21 हजार 195 आहे.             राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशावरुन 11 फेब्रुवारी रोजी रोजी नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा न्यायालय येथे प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा न्यायाधीश-1 एम.एस.आझमी यांच्या हस्ते फित कापून राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश जे.पी.झपाटे, न्यायाधीश पी.बी. घुगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव जयदीप पांडे तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते.या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मोटार अपघात दावा प्रकरणे, कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, राष्ट्रीयकृत बँका व ग्रामपंचायत कराबाबतची प्रकरणे, श्रमिकांचे वाद, भू-संपादन व न्यायालयात प्रलंबीत व वादपुर्व असलेली एकूण सुमारे 95 हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत न्यायाधीश व विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. त्यासाठी वेळोवेळी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विवीध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकेतील पदाधिका-यांच्या बैठका बोलाविल्या व त्यांना राष्ट्रीय लोकअदालतचे महत्व पटवुन दिले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर तसेच जिल्हयातील तालुका विधी सेवा समित्यांनी तसेच सर्व न्यायाधीश व कर्मचारी यांनी आयोजीत राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor Koshyari becomes 'Nikshay Mitra'; Presents Nutritious Diet Kit to TB patient   

Sun Feb 12 , 2023
Mumbai :-Responding to the appeal made by Prime Minister Narendra Modi to become ‘Nikshay Mitra’ and support TB patients for nutritious diet, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented a Nutritious Diet Kit to a TB patient at Raj Bhavan, Mumbai. The Governor announced assuming the responsibility of providing nutritious diet to the patient for one year. The Governor also appealed […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com