नागपुर /केळवद – सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, पोलीस स्टेशन केळवद जि. नागपूर ग्रामीण येथे फिर्यादी नामे- सतिश प्रकाश आढे, वय 30 वर्ष, रा. खुरजगाव पो. मंगसा ता. सावनरे जि. नागपूर यांनी तक्रार दिली की, त्यांची पत्नी हीला WCL तसेच SBI बॅक मध्ये लिपीक पदावर नौकरी लावून देण्याचे आमिष देवून त्यांच्या कडून 10,00,000/-रू. ची मागणी करून 5,85,000/-रू. घेवून त्यांना व्यवस्थापनाचे बनावटी खोटे नेमणूक पत्र तयार करून ते फिर्यादी ची फसवणूक करण्याचे उददेशा ने फिर्यादीला खरे असल्याचे सांगून वेळोवेळी फिर्यादी व त्याच्या पत्नीला WCL कार्यालयात तसेच SBI व्यवस्थापनाचे कार्यालय दिल्ली व SBI शाखा सिडको औरंगाबाद येथे वारंवार बोलावुन त्यांना नौकरी न देता व त्यांच्या कडुन 5,85,000/-रू. घेवुन तिचा गैरवापर घेवुन फसवणुक केली. अशा प्रकारे फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट घेवुन चौकशी अंती अप क्र. 09/22 कलम 420, 467,468,471,120(ब) नुसार आरोपी क्र. 1. षिल्पा राजीव पालपर्थी, 2. अमित मारोती कोवे व 3. रमेश नथ्थुजी कामोने तिन्ही रा. नागपूर यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद असुन तपास आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथे सुरू आहे. सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासामध्ये यातील आरोपी व त्याचे इतर मुख्य सहकारी यांनी आणखी बरेच बेरोजगार नागरीकांची अशा प्रकारे फसवणुक केल्याची बाब निर्देशानात येत आहे. तरी सर्वनागरीकांना या व्दारे आव्हान करण्यात येते की, त्यांची WCL / SBI मध्ये किंवा इतर प्रकारे नौकरी चे आमिश देवुन नमुद आरोपी व त्यांचे इतर मुख्य सहकारी यांनी पैसे घेवून फसवणुक केली असल्यास आपल्याकडे असलेल्या संपुर्ण पुरावे/माहिती/दस्तावेज घेवुन पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण कार्यालय सिव्हील लाईन्स नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.