प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कडे सादर

– संदीप कांबळे,कामठी
स्लग:;10 मार्च रोजी होणार प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध, 5 एप्रिल रोजी होणार अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी
कामठी ता प्र 3:-कामठी नगर पालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून यानुसार काल 2 मार्च ला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर परिषद च्या प्रभागाची संख्या , त्याची प्रभाग निहाय एकूण अनुसूचित जातो तसेच अनुसूचित जमाती सन 2011 च्या जनगननेनुसार लोकसंख्या क्षेत्र , सीमांकन व नकाशा जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोपविण्यात आला आहे.तर प्रारूप प्रभाग रचना ही 10 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर 17 मार्च पर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवीला जाणार आहे.तर 5एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे निवडणूक ह्या मे महिन्यात होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने आता प्रशासक राज सुरू आहे.शहरातील नगरपालिकेत 1 प्रभाग वाढणार असून 2 नगरसेवकांची वाढ होणार आहे.तर प्रभाग रचना नेमकी कशी असेल ,नवीन कोणता भाग वाढला असेल याची उत्सुकता सर्व राजकीय पक्षांना लागली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आगामी नगर परिषद निवडणुकीत जनाधार असलेल्या कांग्रेस कार्यकर्त्यालाच उमेदवारी देणार-माजी जि. प. अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर

Thu Mar 3 , 2022
– संदीप कांबळे,कामठी स्लग-डिजिटल नोंदणी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान-सुरेशभाऊ भोयर कामठी ता प्र 3: –कामठी नगर परिषद मध्ये मागील कित्येक वर्षांपासून कांग्रेसची एकहाती सत्ता असल्याची परंपरा अजूनही कायम असून मागिल 15 वर्षे सतत आमदारकीचा उपभोग घेतलेल्या चंद्रशेखर बावनकुळेला नगर परिषद मध्ये भाजप ची सत्ता बसविण्यात यश आले नाही.कामठी शहर हे कांग्रेसचा गढ आहे ,कामठी तालुक्यात कांग्रेस पक्षाचा मोठा जनाधार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com