प्रत्येक लोकसेवकाला त्यांच्या नोकरीच्या कालावधीत पदोन्नतीचे टप्पे प्राप्त व्हावे ही एक महत्त्वाकांक्षा असते. पदोन्नती हा नोकरीच्या कालावधीतील असा एक टप्पा आहे की, ज्यात अनुभवाच्या आधारे अधिकार तर प्राप्त होतातच सोबत कार्यक्षेत्राची मर्यादा देखील वाढत जाते. त्यामुळे आनंद उत्साह शरीर व मनात संचारतो.
नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत असणारे २२ पोलीस अमलदार यांचे पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण झाले आणि तेही एक खास शैलीमध्ये ! यावेळी पदोन्नतीचे पंचतारा , सोनेरी रंगाची फीत पदोन्नतीचे अंमलदार यांनी स्वतः लावली नाही, तर ती लावली खुद नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल !! एका अगळ्या वेगळ्या शैलीमध्ये पदोन्नतीचा हा कार्यक्रम पोलीस भवन येथे दि९/५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वा पोलीस आयुक्त यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमात पदोन्नती मिळालेले अमलदार यांना पोलीस भवन येथे बोलविण्यात आले . पोलिस अमलदार यांच्या खांद्यावर पोलीस आयुक्त यांनी स्वतः पंचतारे व सोनेरी रंगाची फीत लावून त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मिळालेल्या पदोन्नती नंतर पोलीस आयुक्त यांनी नमूद अंमलदार यांना त्यांच्या जबाबदारी जाणीव तर करून दिली सोबत नागपूर शहर पोलीस दलाला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहे असे प्रतिपादन देखील केले.
” या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये नोकरीच्या कालावधीत पदोन्नती प्राप्त झाल्याने ती कायमस्वरूपी स्मरणात राहील” असे मनोगत पदोन्नती प्राप्त करणारे अमलदार यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त करताना नमूद केले व पोलीस आयुक्त यांचे आभार मानले.