अखेर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल, संसदेत दिसणार; काँग्रेसचा देशभर जल्लोष

नवी दिल्ली :- अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची ऑर्डरही काढण्यात आली आहे. मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष करून आनंद साजरा केला.

लोकसभा सचिवालयाने एक ऑर्डर काढून राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केली आहे. या ऑर्डरमध्ये संपूर्ण गोषवारा देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची 24 मार्च रोजी खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश आला आहे. कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे, असं या नोटिशीत म्हटलं आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Raut retains twin titles

Mon Aug 7 , 2023
Nagpur :- Kunal Raut of Mahasagar retained double crown of the Ankur Seeds Carrom Tournament for Media Employees organised by Patrakar Club of Nagpur and Sports Journalists’ Association of Nagpur at Press Club, Civil Lines on Sunday. In the men’s singles final Raut defeated Vijay Thakur of PTI Digital while in doubles Raut and Vinod Suryawanshi ousted the pair of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com