महाविकास आघाडीचे आमदार भोपळा घेऊन उतरले विधानभवनाच्या पायर्‍यांवर…

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा;घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

मुंबई :- बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्‍यांवर आंदोलन केले.

NewsToday24x7

Next Post

गौतम नगरात सुकन्या समृद्धि योजना शिबिराचे आयोजन

Fri Mar 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-पोस्ट मास्टर जनरल नागपुर ऑफिस तर्फे सुकन्या समृद्धि योजना आणि अटल पेंशन योजनाचे शिबिर गौतम नगर जूनी छावनी कामठी येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. Your browser does not support HTML video. कामठी हेड पोस्ट ऑफिस चे डेप्यूप्टी पोस्ट मास्टर मंगेश घोडवैद्य यांनी उपस्थित नागरिकांना सुकन्या समृद्धि योजना, अटल पेंशन योजना बाबत माहिती दिली केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com