इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

मुंबई :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने सुधारित केलेली अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www. mscepuppss.in आणि https://www. mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. 6 मार्च 2024 रोजी परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असेही परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

Thu Mar 28 , 2024
मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com